भारतात ३ लाख ९५ हजारांपेक्षा जास्त कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण

नवी दिल्ली: भारतात ३ लाख ९५ हजार १९२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत देशात १ कोटी १७ लाख ८७ हजार ५३४ जणांना कोरोना या संसर्गजन्य आजाराची बाधा झाली. यापैकी १ कोटी १२ लाख ३१ हजार ६५० जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे देशात आतापर्यंत १ लाख ६० हजार ६९२ जणांचा मृत्यू झाला. दिलासा देणारी बाब म्हणजे देशात आतापर्यंत ५ कोटी ३१ लाख ४५ हजार ७०९ जणांना कोरोना प्रतिबंधक लसचा किमान एक डोस देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी गुरुवार २५ मार्च २०२१ रोजी सकाळी दिली

You May Also Like