भारतीय संघ इंग्लंडला व्हाईट वॉश देणार: मॉन्टी पानेसर

मुंबई : इंग्लंडचा माजी फिरकीपटू मॉन्टी पानेसरने भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेच्या निर्णयाचे भाकीत वर्तवले आहे. त्याने आगामी इंग्लंड भारत 5 सामन्यांची कसोटी मालिका भारत 5 – 0 असा खिशात घालेल असे सांगितलंय. पण, याच्यात त्याने जर तरची भाषा वापरली आहे. तो म्हणाला की जर उष्ण ऑगस्ट महिन्यात खेळपट्ट्यांनी फिरकीला साथ दिली तर भारत मालिका 5 – 0 अशी खिशात घालेल.

दरम्यान, मॉन्टी पानेसर याने जर भारताला त्यांच्या बलस्थानानुसार खेळपट्ट्या मिळाल्या तर ते इंग्लंडचा कमकुवतपणा उघडा पाडतील. त्याने कसोटी मालिका ही ऑगस्ट महिन्यात सुरु होणार आहे याच्याकडे लक्ष वेधले. त्यावेळी इंग्लंडमधील वातावरण उष्ण असते.

भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल न्यूझीलंडबरोबर इंग्लंडमध्ये खेळणार आहे. हा अंतिम सामना झाल्यानंतर ऑगस्ट महिन्यात भारत इंग्लंडमध्येच इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांचा मालिका खेळणार आहे. गेल्या वेळी भारतात टीम इंडिया आणि इंग्लंड भारतात एकमेकांना भिडले होते. त्यावेळी भारताने इंग्लंडला 3 – 1 असे पराभूत केले होते.

भारतीय संघाकडे अश्विन, जडेजा अनुभवी फिरकीपटू आहेत. या दोघांनीही काही महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियात प्रभावी गोलंदाजी केली होती. याचबरोबर अक्षर पटेलनेही इंग्लंड विरुद्धच्या मायदेशातील पदार्पणाच्या कसोटी मालिकेत धुमाकूळ घातला होता. याचबरोबर भारताकडे वॉशिंग्टन सुंदरचाही पर्याय उपलब्ध आहेत.

You May Also Like