ममता बॅनर्जींचा व्हीलचेअरवरून प्रचारास सुरुवात; कोलकातामध्ये मोठा रोड शो

नवी दिल्ली: नंदीग्राममधील हल्ल्यात जखमी झालेल्या आणि पायात प्लॅस्टर असलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपण येत्या काही दिवसांतच पुन्हा प्रचारात  सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं होतं. याचपार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी व्हीलचेअरवरून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ममत बॅनर्जी व्हीलचेअरवरून कोलकताच्या गांधी मूर्तिजवळ पोहचल्या. त्यानंतर गांधी मूर्तिपासून हाजरापर्यत ‘रोड शो’ला सुरुवात झाली.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी  अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये झालेल्या कथित हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत.

You May Also Like