महाराष्ट्र : राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या

राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून या परीक्षा आता 10 ते 30 जूनदरम्यान पार पडणार आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या बैठकीनंतर 2 जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बुधवारी परीक्षेसंबंधी माहिती दिली. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत परीक्षांसदर्भात चर्चा करण्यात आली. या परीक्षांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीओटीएच आणि बीएससी नर्सिंग या पदवी परीक्षांच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षांच्या परीक्षांचा समावेश आहे.

You May Also Like

error: Content is protected !!