महावितरणने ‘खंडीत’ केला शेतकऱ्यांचा वीज पुरवठा; पिकास पाणी देता येत नसल्याने शेतकरी ‘संतप्त’

मोरगांव – महावितरण कंपनीच्या मोरगाव शाखेअंतर्गत येणाऱ्या चार गावांतील कृषी विजपंप विजबिल थकबाकी अडीच कोटी रुपये झाली आहे. महावितरण कंपनीकडून आज (दि .१६) रोजी कृषीविजपंपचा थ्री फेज पुरवठा बंद केल्यामुळे पाणी उपलब्ध असूनही पिकास पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांकडुन तिव्र संताप व्यक्त केला.

महावितरण कंपनीच्या मोरगाव शाखे अंतर्गत मोरगांव, आंबी, जोगवडी, तरडोली ही चार गावे येतात. गेल्या अनेक महीन्यांपासून देय असलेल्या विजबिल येथील शेतकऱ्यांनी भरली नसल्याने त्याची एकूण रक्कम अडीच कोटी रुपयांपेक्षा अधीक झाली आहे. यामुळे जेजुरी येथून येणाऱ्या थ्री फेज मुख्य विज वाहीनीचा जंप आज सकाळपासूनच सोडविण्यात आला होता.

तीन फेज पैकी केवळ दोन फेजला विजपुरवठा केला जात असल्याने कृषीपंप आज चालु होत नव्हते. विजबिल तात्काळ भरुन विजवितरण कंपनीला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे शाखा अभीयंता दिलीप नाळे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

You May Also Like