महिलांचे Sex hormones पुरूषांचे covid-19 मृत्यू रोखण्यास उपयुक्त, संशोधकांचा दावा

भारतात कोरोना रूग्णांचा आकडा काही राज्यांमध्ये वाढलेला असतानाच महाराष्ट्रानेही कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा एकदा डोक वर काढले आहे. महाराष्ट्रात वाढणारी रूग्णसंख्या ही भारतात सर्वाधिक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही नुकतेच जाहीर केले आहे. देशभरात कोरोना रूग्णांची वाढ होणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये ९ जिल्हे महाराष्ट्रातील असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले. भारतात एकुण ५३ हजार इतक्या नक्या रूग्णांची नोंद गेल्या २४ तासात झाली आहे. तर २५१ कोरोना रुग्णांचा मृत्यू भारतात झाला आहे. अनेक अभ्यासामधून आतापर्यंत आढळले आहे की, कोरोना व्हायरसने महिलांपेक्षा अधिक पुरूषांचा बळी घेतला आहे. त्यामुळेच संशोधकांच्या एका नवीन संशोधनानुसार महिलांच्या माध्यमातूनच पुरूषांचा वाढता मृत्यूदराचा आकडा कमी करण्यासाठी मदत होऊ शकते असे संशोधन समोर आले आहे. महिलांचे सेक्स हार्मोन्स (संप्रेरक) प्रोजेस्टेरॉन हे पुरूषांमध्ये सोडून (इंजेक्ट) करून पुरूषांचा वाढता मृत्यूदर कमी होऊ शकतो असा संशोधकांचा दावा आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने एका जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासाचा दाखला देत ही माहिती समोर आणली आहे. त्यामुळेच पुरूषांचा मृत्यूचा आकडा कमी करण्यासाठी महिलांची मोठी मदत होऊ शकते असा दावा या संशोधनातून करण्यात आला आहे.

अमेरिकन जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार प्रोजेस्टेरॉनची निर्मिती ही पुरूषांच्या आणि महिलांच्या अशा दोघांच्याही शरीरात होत असते. पण महिलांना येणाऱ्या मासिक पाळीमुळे या प्रोजेस्टेरॉनची निर्मिती करण्याची क्षमता महिलांमध्ये अधिक असते. त्यामुळेच महिलांच्या सेक्स हार्मोन्समधील प्रोजेस्टोरॉनचा वापर हा पुरूषांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. या संशोधनासाठी कोरोनाची लागण झालेल्या ४० पुरूष रूग्णांचा समावेश कोरोनाच्या उपचारादरम्यान करण्यात आला होता. त्यामध्ये पुरूषांचे दोन गट अभ्यासाठी करण्यात आले होते. त्यापैकी एका गटाला कोरोनासाठीचा नियमित असा औषधोपचार देण्यात आला. तर दुसऱ्या पुरूषांच्या गटात दिवसापोटी दोनवेळा असे प्रोजेस्टेरॉन १०० मिलीग्रॅम या प्रमाणात इंजेक्ट करण्यात आले. जोपर्यंत कोरोनावर उपचार पुर्ण होत नाहीत तोवर या दोन्ही गटातील पुरूषांना डिस्चार्ज होईपर्यंत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सातव्या दिवशी सर्व पुरूष रूग्णांच्या आरोग्यांचे मूल्यांकन १ ते ७ या क्रमवारीत करण्यात आले. त्यामध्ये सातव्या क्रमांकासाठी हॉस्पिटलमध्ये उपचार न घेतलेले पुरूष तर पहिल्या श्रेणीत कोरोनो रूग्णाचा मृत्यू अशी वर्गवारी करण्यात आली.

या संपुर्ण संशोधनादरम्यान नियमित कोरोनाचा उपचार मिळालेल्या पुरूषांच्या तुलनेत हार्मोन्सची ट्रिटमेंट मिळालेल्या पुरूषांचा निकाल हा दीडपटीने उत्तम होता. हार्मोन्स देण्यात आलेल्या पुरूषांना हॉस्पिटलमधून कमी दिवसातच डिस्चार्ज मिळाला. तर ऑक्सिजनची आवश्यकता आणि वेंटीलेशनचीही गरज भासली नसल्याची माहिती अभ्यासातून समोर आली. महत्वाचे म्हणजे या हार्मोन्स ट्रिटमेंटचे कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नाहीत. पण दोन्ही पुरूषांच्या श्रेणीत प्रत्येक एक असा पुरूषांचा मृत्यूदराचा आकडा होता असेही संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.

संशोधकांच्या अभ्यासानुसार प्रोजेस्टेरॉनचे वैशिष्ट्य हे एन्टी इनफ्लेमेटरी प्रॉपर्टी म्हणून आहे. त्यामुळेच मृत्यूचा धोका कमी होण्यासाठी हे हार्मोन मदत करते. आपल्या शरीरासाठी धोकादायक असे crytokine strom ज्यामुळे मृत्यूचा धोका जास्त असतो, याचा धोका कमी करण्यासाठीही प्रोजेस्टेरॉन मदत करते. पण एकाचवेळी मोठ्या प्रमाणात प्रोटेस्टेरॉनचा वापर हा विभिन्न अशा पुरूषांच्या लोकसंख्येसाठी करण्यासाठी संशोधनातील मर्यादा आहेत. त्यामुळेच मोठ्या पातळीवर याचा अभ्यास होण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली आहे.

You May Also Like