मी त्याची कशी मदत करू शकते सांगा…! झोमॅटोच्या ‘कामराज’ला परिणीती चोप्राची साथ

झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय आणि बेंगळुरूतील एका महिलेने केलेले त्याच्यावरचे आरोप सध्या चर्चेत आहेत. ऑर्डर रद्द केल्यामुळे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने आपल्या नाकावर बुक्का मारल्याचा आरोप संबंधित महिलेने केला होता. मात्र यानंतर आरोप झेलणा-या त्या डिलिव्हरी बॉयने वेगळीच आपबीती सांगितली होती. मी नाही तर त्या महिलेनेच मला मारहाण केली होती, असा उलट आरोप त्याने केला होता. हे प्रकरण गाजत असताना आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिने या वादात उडी घेतली आहे. तुमचा हा डिलिव्हरी बॉय निर्दोष आहे, याची मला खात्री आहे. झोमॅटो इंडिया, मी त्याची कशी मदत करू शकते, ते कृपया सांगा, असे ट्विट परिणीतीने केले आहे.

You May Also Like