मुंबईकरांनी टीम इंडियाची लाज वाचवली, सूर्यकुमार यादव अन् शार्दूल ठाकूरनं कमाल केली

तिसऱ्या अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे चौथ्या कसोटीत टीम इंडियाला दोन धक्के दिले. पण, सूर्यकुमार यादवनं  मिळालेल्या संधीचं सोनं करताना टीम इंडियाला ८ बाद १८५ धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडच्या बेन स्टोक्स व जॉनी बेअरस्टोनं टीम इंडियाच्या हातून सामना खेचला होता, परंतु शार्दूल ठाकूरनं १७व्या षटकात सामना फिरवला. शार्दूलनं इंग्लंडच्या स्टोक्स व कर्णधार इयॉन मॉर्गन यांना सलग दोन चेंडूवर बाद केलं अन् टीम इंडियाच्या ताफ्यात नवचैतन्य संचारले. पण, शार्दूलने टाकलेल्या अखेरच्या षटकानं धाकधूक वाढवली होती, परंतु भारतानं सामना ८ धावांनी जिंकून मालिका २-२ अशी बरोबरीत आणली. इंग्लंडला ८ बाद १७७ धावा करता आल्या. शार्दूलनं ४२ धावांत ३ विकेट्स घेतल्या.

You May Also Like

error: Content is protected !!