मुंबईत : स्थिती उत्तम, बारा वॉर्ड ‘दोनशे प्लस’ डबलिंग! रुग्ण दुपटीचा कालावधी दोनशेकडे

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना चांगला नियंत्रणात आला असून 24 पैकी 12 वॉर्डमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी 200 दिवसांपार गेला आहे. रुग्ण दुपटीचा एकूण कालावधी 190 दिवसांपार गेला असून ‘सी’ प्रभाग मरीन लाइन्सची स्थिती 337 दिवसांसह सर्वोत्तम आहे. तर ‘आर’/उत्तर प्रभाग दहिसरमध्ये सर्वात कमी म्हणजे 137 दिवस रुग्ण दुप्पट कालावधी आहे.

मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत जाऊन दररोज 10 हजारांचा टप्पा ओलांडला होता, मात्र पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे. दररोजची रुग्णसंख्या आता दोन हजारांच्या खाली आली आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 12 वॉर्डची स्थिती सुधारली आहे. यामध्ये मरीन लाइन्सनंतर एन विभाग घाटकोपरमध्ये 272 दिवस, टी विभाग मुलुंडमध्ये 267 दिवस, एम पश्चिम चेंबूर पश्चिममध्ये 266 दिवस आणि जी उत्तर दादरचा रुग्ण दुपटीचा कालावधी 251 दिवस झाला आहे.

बरे होण्याचा कालावधी वाढला

मुंबईत रुग्ण बरे होण्याचा कालावधी वाढला असून 92 टक्क्यांवर गेला आहे, तर वाढीचा दर 0.36 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यामध्ये सी वॉर्ड मरीन लाइन्सची स्थिती सर्वोत्तम असून रुग्णवाढीचा दर 0.21 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. तर दहिसरमध्ये रुग्णवाढीचा दर सर्वाधिक म्हणजे 0.51 टक्के आहे.

25 हजार रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

मुंबईत 12 मेच्या आकडेवारीनुसार 38,859 सक्रिय रुग्ण आहेत, पण यातील 25 हजार 210 रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तर 12,187 रुग्णांमध्ये लक्षणे असून 1462 रुग्णांची प्रकृती अत्यवस्थ असल्याची माहिती पालिकेने डॅशबोर्डवर नमूद केली आहे. 89 हजार 700 रूपयांचा दंड वसुल केला आहे.

You May Also Like