मुंबई : 11 मे 2021 लशीचे दोन्ही डोस घेऊनही मोहन जोशी यांना कोरोनाची लागण; मालिकेच्या शूटिंगसाठी होते गोव्यात

मुंबई : कोरोनाचा हाहाकार थांबण्याचं नाव घेत नाही. देशभरात कोरोनाची भयानक स्थिती निर्माण झाली आहे. अनेकांना कोरोणाची लागण झाली आहे. यात अनेक कलाकार , सेलिब्रिटींचाही समावेश आहे. आता मराठी मालिकांच्या जगाला एक धक्का आणखी बसला आहे. सुरुवातीला मालिकांचं चित्रिकरण थांबलं, ते इतर राज्यांत गेलं. पुरेशी काळजी घेऊनही कलाकार आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत.. त्यातलं ताजं नाव आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. मराठी सिनेसृष्टीतील या लोकप्रिय कलाकाराला कोरोनाची लागण झाली आहे.

जोशी यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे. Insta story च्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांनाही काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे.

You May Also Like