मुंबई – May 10,2021 ऑक्सिजन टँकरचा रस्ता चुकला अन् घात झाला; ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक नागरिक या विषाणूच्या विळख्यात सापडेल असून, सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याच काही ठिकाणी रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन पुरवठ्यामुळे प्राणला मुकाव लागलं.

सध्या संपूर्ण देशात आरोग्य व्यस्थेचे तीन तेरा वाजच्याचे चित्र दिसून देत आहे. अश्या गंभीर परिस्थिती हैदराबादमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. हॉस्पिटला येणार ऑक्सिजन टँकर रस्ता चुकल्याने ७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. हैदराबादमधील किंग कोटी रुग्णालयात काही कोरोना रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात ७ रुग्णांची स्थिती अत्यवस्थ होती.

त्यांना तात्काळ ऑक्सिजनची गरज होती. यासाठी ऑक्सिजनची व्यवस्थाही करण्यात आली. मात्र हा टँक भरण्यासाठी निघालेला टँकर रस्ता चुकला आणि ७ जणांचा जीव गेला. वाट चुकलेल्या टँकरला रस्ता दाखवण्यासाठी नारयानगुंडा पोलिसांनी प्रयत्नही केले. मात्र टँकर येईपर्यंत उशिर झाला आणि या रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

You May Also Like