मुंबई : May 10,2021 BCCI चा मास्टर प्लॅन: विराट, रोहित शिवाय टीम इंडिया करणार श्रीलंकेचा दौरा

मुंबई, 10 मे: टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार असल्याची घोषणा भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे. तीन वन-डे आणि पाच टी 20 सामने या दौऱ्यात होणार आहेत. या दौऱ्यात कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासह अनेक दिग्गज खेळणार नाहीत. कारण, हे सर्व जण त्यावेळी इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिजची तयारी करणार आहेत. त्यामुळे या मालिकेसाठी बीसीसीआय नव्या खेळाडूंना संधी देणार आहे.

काय आहे मास्टर प्लॅन?

सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “आम्ही जुलैमध्ये मर्यादीत ओव्हर्सची मालिका खेळण्याची योजना तयार केली आहे. इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या टीमपेक्षा ही टीम वेगळी असेल. या टीममध्ये व्हाईट बॉल स्पेशालिस्ट खेळाडूंचा समावेश होणार आहे.”

भारतीय टीमचा इंग्लंड दौरा 14 सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यानंतर आयपीएलचे उर्वरित 31 सामने खेळवण्याचा विचार देखील बीसीसीआय करत आहे. त्यामुळे शिखर धवन, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, युजवेंद्र चहल हे खेळाडू आयपीएलसाठी सज्ज असावेत म्हणून त्यांना श्रीलंका दौऱ्यात संधी देण्याची बीसीसीआयची योजना आहे.

भारतीय टीम कोरोनाच्या संकटात लागोपाठ क्रिकेट खेळत आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईमध्ये आयपीएल झाली, यानंतर भारतीय टीम नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत ऑस्ट्रेलियात होती. यानंतर जानेवारी ते मार्च घरच्या मैदानात इंग्लंडविरुद्धची सीरिज झाली आणि मग आयपीएल सुरू झाली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफना कोरोना झाल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यात आली.

KKR च्या ‘या’ स्टार खेळाडूसाठी गोड बातमी, लवकरच होणार बाबा!

सप्टेंबर महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावरून परत येईल, त्यामुळे आयपीएल झाली नाही तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सीरिज प्रस्तावित आहे. या सीरिजला टी-20 वर्ल्ड कपची तयारी म्हणूनही पाहिलं जात आहे, पण टी-20 वर्ल्ड कपच्या भारतातल्या आयोजनाबाबतही शंका आहे. देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातला टी-20 वर्ल्ड कप युएईमध्ये खेळवला जाऊ शकतो.

You May Also Like