मुक्ताईनगर : 11 मे 2021 अक्षय हिरोळे यांचा राज्यस्तरावर कोविड योध्दा सन्मानपत्र देवुन गौरव…

मुक्ताईनगर : अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक आयोजित कोविड योद्धा महासन्मान ऑनलाईन झूम अँप सोहळा 2021 या कार्यक्रमामध्ये ना.पो.कॉ. मनोजकुमार (अक्षय) सखाराम हिरोळे, नेम. एस.डी.पी.ओ. कार्यालय, मुक्ताईनगर उपविभाग यांना त्यांच्याकडुन कोरोना काळात त्यांच्यापरीने झालेल्या कार्याबद्दल त्यात पोलीस दलात आपला जीव धोक्यात घालुन कर्तव्य बजावत असतांना, मानवसेवा हिच ईश्वर सेवा याने प्रेरीत होवुन गोर गरीबांना कोविड अनुशंगाने शक्य होईल ती मदत करणे, मास्क /सँनिटायझर वाटप, सोशल मिडीया वरुन कोरोना विषयी अफवांना बळी न पडता नागरीकांमध्ये कोरोनाबाबत जनजागृती करणे, गर्दी न करता सोशीयल डिस्टंन्सीगचे पालन करणे वगैरे करीता त्यांना राज्यस्तरीय कोवीड योध्दा सन्मानपत्र देवुन गौरविण्यात आले आहे. त्यांनी पोलीस दलाचे नाव उज्वल केल्याने त्यांचेवर शुभचिंतकांकडुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

You May Also Like