मोठी बातमी! राज्यात नागपूरनंतर आता आणखी एका जिल्ह्यात लॉकडाऊन

परभणी | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस कोरोना रूग्णांचे आकडे मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत. कोरोनाच्या वाढत चाललेल्या फैलावामुळे राज्यातील काही जिल्ह्यात प्रशासनाने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच नागपूरनंतर आता परभणी जिल्ह्यात दोन दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय तेथील स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.

दोन दिवस परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन असणार असून यामध्ये 13 आणि 14 मार्चला लॉकडाऊन राहणार आहे. या दोन दिवसांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व गोष्टी बंद राहणार आहेत. आज मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन चालू होणार असून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती समजत आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊन होणारा परभणी हा दुसरा जिल्हा आहे. याआधी नागपूरमध्ये सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर शहरात 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाउनची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी नागपूरमध्ये लॉकडाऊनच्या काळात खासगी कार्यालयं बंद आहेत तर शासकीय कार्यालयात 25 टक्के उपस्थितीला परवानगी आहे. खासगी आणि शासकीय आर्थिक विषयक, लेखा आणि मार्च एंडिंग संबंधित कार्यालयं पूर्ण क्षमनेते सुरु राहणार असल्याचं नगपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं होतं.

दरम्यान, कोरोना पुन्हा आपलं डोक वर काढत आहे. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून आपण कोरोनाचे सर्व पाळले पाहिजेत. अन्यथा नाईलाजाने आपल्याला पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोर जावं लागेल.

You May Also Like