‘यास′ चक्रीवादळामुळे मान्सून लांबणीवर? शेतकर्‍यांच्या चिंतेत वाढ

मुंबई : देशाच्या पश्चिम किनारपट्टीला तौत्के चक्रीवादळानं तडाखा दिला आहे. यानंतर आता देशाच्या पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळाचं संकट घोंघावत आहे. असं असलं तरी उर्वरित देशातील शेतकर्‍यांना एक वेगळीचं चिंतेचे वातावरण बनलं आहे.

दरम्याण, या मार्गात येणार्‍या सर्व गोष्टींना आपल्या कवेत घेऊन पुढे सरसावणार्‍या यास चक्रीवादळाचा परिणाम मान्सूनवरही होईल का? अशी भीती देशातील शेतकर्‍यांना सतावत आहे. गेल्या आठवड्यात 21 मे रोजी बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनचं आगमन झालं आहे. तर 1 जूनला केरळात मान्सून आगमन होण्याची शक्यता आहे. पण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या वादळांमुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

चक्रीवादळांमुळे मान्सून पोहोचण्यास विलंब झाल्यास शेती आणि शेतकर्‍यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात विविध ठिकाणी खरिप हंगामाच्या कामांना सुरुवात झाली आहे. पण मान्सूनच्या आगमनाला विलंब झाल्यास पेरणी लांबू शकते. परिणामी शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नावर देखील याचा परिणाम होऊ शकतो. असे सांगण्यात येतंय.

You May Also Like