यूपीएससीची पूर्व परीक्षा 10 ऑक्टोबरला

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ ची तारीख बदलली आहे. यापूर्वी ही पूर्व परीक्षा २७ जून २०२१ रोजी होणार होती. मात्र लांबणीवर टाकण्यात आली आहे. नव्या तारखेची घोषणाही केली आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. आता ही परीक्षा १० ऑक्टोबर २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे.
गेल्या वर्षी देखील करोनामुळे आयोगाने नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२१ स्थगित केली होती. त्यावेळीदेखील ही परीक्षा ऑक्टोबर २०२० मध्ये घेण्यात आली होती. जून २०२० ऐवजी ४ ऑक्टोबर २०२० रोजी ही पूर्व परीक्षा देशभरात विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली.  परीक्षेसंबंधी कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी यूपीएससीशी कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळी १०  ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत संपर्क साधता येणार आहे.

 

You May Also Like

error: Content is protected !!