लय भारी! ना बँडबाजा ना पंगत; यवतमाळमध्ये फक्त १३५ रूपयांमध्ये पार पडला विवाहसोहळा

लग्न म्हटलं की, खर्च, पाहूणे, जेवणाचा मेन्यू, खरेदी हे सगळं आलंच. घरात एखादं लग्न कार्य करायचं म्हटलं तर लोक आयुष्यभर कमावलेले पैसे खर्च करतात आणि थाटामाटात सोहळा करतात. सध्या कोरोनाचं सावट असल्यामुळे अनेक ठिकाणी ५-१० नातेवाईकांना बोलावून अनेकांनी लग्न उरकलं. सोशल मीडियावर अशाच एका लग्नाचा फोटो तुफान व्हायरल होत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही पण फक्त १३५ रुपयांमध्ये हा विवाह सोहळा पार पडला आहे.

यवतमाळमध्ये हा अनोखा लग्न सोहळा पार पडला आहे. वधू मंगला संजय श्रीरामजिकर ही यवतमाळ तालुक्यात येणाऱ्या अकोला बाजार कामठवाडा येथील रहिवासी आहे तर वर राजेश बोरकर अमरावती येथील दस्तुरनगर येथे वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे दोघेही मूक बधिर आहेत. या दोघांच्याही नातेवाईकांनी पुढाकार घेऊन गे लग्न जमवलं.

खर्च कमी येण्यामागचं कारण म्हणजे कमीत कमी नातेवाईकांची उपस्थिती या लग्नाला होती. मुलाचे आई वडील, काका, काकू आणि मुलीचे आई वडील, बहीण, भाऊ एवढेच लोक लग्नाला हजर होते. सर्व नातेवाईक नोंदणी कार्यालयात आले आणि केवळ135 रुपये खर्च करून हे लग्न उरकलं

You May Also Like