लाचखोर तहसीलदाराचा कारनामा! ACB टीम दारात पोहोचताच केली 20 लाखांची होळी

सिरोही, 25 मार्च: पकडले जाऊ या भीतीपोटी एका तहसीलदाराने चक्क 20 लाखांची होळी केली आहे. घरातील गॅसवरच या तहसीलदाराने हे 20 लाख रुपये जाळले आहेत. एका प्रकरणातील चौकशीचे धागेदोरे या तहसीलदारापर्यंत पोहोचले होते, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण?

राजस्थानच्या सिरोही येथे लाच घेणाऱ्या एका तहसीलदाराने पकडले जाऊ या भीतीपोटी घराच्या गॅसवर 20 लाख रुपये जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एसीबीने पिंडवाड्यातील महसूल इन्सपेक्टरला एका टेंडरच्या बदल्यात 01 लाखांची लाच घेताना पकडले. या पोलीस निरिक्षकाने अशी माहिती दिली की ही लाच त्याने तहसीलदाराकरता घेतली होती. या माहितीच्या आधारे एसीबीची टीम टीम तहसीलदार कल्पेश जैन यांच्या घरामध्ये पोहोचली.

एसीबीने जेव्हा छापा टाकला त्यावेळी हे तहसीलदार महाशल पैशांना आग लावत होते. या सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. एसीबीच्या आदेशाला न जुमानता त्याने या पैशांची होळी केली.

पाहा व्हिडीओ

 

एसीबीला पाहून जैनने दरवाजा आतून बंद करून घेतला. एसीबीने कटरने दरवाजा तोडला आणि जे काही पाहिले ते धक्कादायक होते. जैनने 20 लाख रुपये गॅसवर जाळले होते.

You May Also Like