लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या परीक्षार्थी तरुणीला पोलिसांची मदत; गृहमंत्री व सुप्रिया सुळे यांनी ट्विटद्वारे केले कौतुक

औरंगाबाद: बाहेरगावाहून रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेली तरुणी औरंगाबादेत उतरताच लॉकडाऊनमुळे गांगरून गेली. गाड्या उपलब्ध नसल्याने अखेर येथील बंदोबस्तावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी या तरुणीला स्वतःच्या गाडीवर परीक्षा स्थळी नेऊन पोहोचवले. पोलीसांच्या मदतीमुळे ती परीक्षा देऊ शकली बंदोबस्त सोबतच सामाजिक कामात पोलिसांची तत्परता पाहून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व खासदार सुप्रिया सुळे यांनी याची दखल घेत त्या पोलिसाचे कौतुक केले.

बुलढाणा येथील एक तरुणी शहरात रेल्वे बोर्डाची परीक्षा देण्यासाठी आली होती तिचे पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालयात सेंटर आले होते. तेथे जाण्यासाठी तिने अनेक रिक्षा चालकांना थांबण्याचा इशारा केला परंतु एकही रिक्षावाला थांबत नसल्याने ती घाबरली. दुपारचे एक वाजता आले आणि पेपर दीड वाजता सुरू होणार होता.

You May Also Like