लोकसभा मतदारसंघाचे गुलाबराव वाघ यांनी १८ वर्षे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून यशस्वी कारकिर्द सांभाळली

धरणगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे गुलाबराव वाघ यांनी १८ वर्षे शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून यशस्वी कारकिर्द सांभाळली. म्हणून शिवसेना पक्षप्रमुख लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची बढती करुन शिवसेना जळगाव लोकसभासह संपर्क प्रमुख नियुक्ती करण्यात आली. त्या बद्दल माळी समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

त्यानिमित्ताने समाजाच्यावतीने समाज अध्यक्ष विठोबा नामदेव महाजन यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सचिव दशरथ महाजन, उपाध्यक्ष निंबाजी माळी, सहसचिव डिगंबर महाजन, कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, विश्वस्त विजय भाऊ महाजन तसेच संजय महाजन (उपाध्यक्ष. रामायण मढी), योग राज खलाणे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुढील वाटचालीसाठी माळी समाजाचा पंच मंडळांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. गुलाबराव वाघ यांनी आभार मानतांना सागितले की, समाजाचा उन्नती तसेच संघटन, समाजाचा विकासासाठी मी आपल्या मागे खंबीरपणे उभे उभा राहिल असे वचन दिले.

You May Also Like