लोटे एमआयडीसीत भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, तिघे गंभीर

रत्नागिरी : लोटे एमआयडीसीमधील  घरडा  इथे एका केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू तर तीन कामगार गंभीर जखमी आहेत. या तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. शनिवारी सकाळी एकापाठोपाठ एक असे दोन स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनीला आग लागली. यामध्ये अनेक कामगार जखमी झाले. 

जखमी कामगारांना कळबणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपनीतील बॉयलर गरम होऊन अचानक स्फोट झाल्याचं सांगण्यात येत आहे. या स्फोटात सहा जण जखमी झाले होते, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला. तर स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे कंपनीत 40-50 जण अडकले होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. घटनास्थळी सात ते आठ ॲम्बुलन्स दाखल आहेत. अग्निशमन दलाने आगीवर यश मिळवत, जखमी कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल केलं.

You May Also Like