विराट कोहलीचे गुरू सुरेश बत्रांचे निधन

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे बालपणाचे प्रशिक्षक सुरेश बत्रा यांचे वयाच्या 53व्या वर्षी निधन झाले. विराटचे मुख्य प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून बत्रा यांनी काम केले.

विजय लोकपल्ली यांच्या या ट्वीटवर विराट कोहलीच्या चाहत्यांनी आणि इतरांनीही बत्रा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विराटव्यतिरिक्त सुरेश बत्रा यांनी भारतीय ज्युनियर संघाचा फलंदाज असलेल्या मनजोत कालराला प्रशिक्षित केले. मनजोत कालराने 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शानदार शतक झळकावले आणि टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

राजकुमार शर्मा यांच्यासमवेत सुरेश बत्रा यांनी पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये विराट कोहलीसह अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिलंय. विराटचे मुख्य प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

You May Also Like