संगमनेर : May 10,2021 संगमनेर तालुक्यात लसीकरणापूर्वी रॅपीड अँटीजेन टेस्ट अनिवार्य

राज्यात १८ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. लसींचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने जितका पुरवठा आहे तितके लसीकरण केले जाते. सध्या ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येत आहे. तर १८ वर्षांवरील नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात येत आहे. नागरिकांची लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी पहायाला मिळत आहे. लसींचा तुटवडा असल्याचे सांगितले असतानाही नागरिक लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी करतात. याच गर्दीला आळा घालण्यासाठी संगमनेर जिल्ह्यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. संगमनेर तालुक्यात लसीकरणाआधी नागरिकांचा रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश संगमनेर तहसीदारांनी काढले आहे.

संगमनेर तालुक्याचे लहसीलदार अमोल निकम यांनी तालुक्यातील सर्व लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाची रॅपिड अँटीजेन टेस्ट करणे अनिवार्य आहे. अँटीजेन टेस्टमुळे लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकाला काही लक्षणे दिसून आल्यास त्याला कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात येईल. किंवा काही मध्यम लक्षणे असतील त्यांना कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल करण्याचे आदेश तहसीलदारांनी दिले आहेत.

गेल्या काही दिवसात संगमनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली होती. अशा परिस्थिती संगमनेरमध्ये लवकरात लवकर लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. मात्र लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडत आहे. प्रशासनाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या बैठकीत लसीकरण केंद्रावर होणाऱ्या गर्दीवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी संगमनेर तहसीलदारांनी यावर तोडगा म्हणून लसीकरणापूर्वी रॅपीड अँन्टीजेन टेस्ट करण्याचे आदेश दिले आहेत.

You May Also Like