सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवार म्हणाले,.

मुंबई – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसनंतर आता एनआयएकडून मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला असताना संभाव्य अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेणाऱ्या वाझे यांना दिलासा मिळू शकलेला नाही. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज कोठडी मिळविण्यासाठी वाझेंना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

सचिन वाझेंवर एनआयएने गंभीर आरोप केले असून, अटकेनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या प्रकरणाबाबत बारामती येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला, मात्र सचिन वाजे प्रकरणा बाबत मी काही सांगू शकत नाही. असं म्हणत यावेळी शरद पवार यांनी सचिन वाझेंबाबत मात्र बोलणं टाळलं.

दरम्यान, मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणीत सुरुवातीपासूनच सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्या निलंबनाची मागणी भाजपकडून केली जात होती. मनसूख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झालेलं दिसून येत आहे. भाजप नेते राम कदम यांनी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी ट्विट करत केली आहे.

You May Also Like