“सचिन वाझेंमुळे ‘मातोश्री’ अडचणीत, त्यांच्या जीवाला धोका; तातडीने संरक्षण द्या, मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा”

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी  यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू  आणि त्यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे  यांना झालेली अटक या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान आता आमदार रवी राणा  यांनी सचिन वाझेंचाही हिरेन होईल, त्यांना तातडीने संरक्षण द्या अशी मागणी केली आहे. तसेच त्यांना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवा असं देखील म्हटलं आहे.

“सचिन वाझे यांचंही मनसुख हिरेनप्रमाणे होऊ शकतं, त्यांच्या जीवाला धोका आहे. सचिन वाझे यांच्यामुळे मातोश्री अडचणीत आली आहे. मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवा असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. तसेच आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत. देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांच्याही जीवाला आहे असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.

You May Also Like