सचिन वाझे तणावात होते, त्यांना या प्रकरणात अडकवण्यात आलं; भावानं दिली पहिली प्रतिक्रिया

२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणात सचिन वाझे यांचं नाव येत असल्याने परवाच मी मुंबईत येऊन गेलो. त्यावेळी सचिन हे तणावात होते असून त्यांना अटक करून या प्रकरणात अडकविण्यात आलं असल्याची प्रतिक्रिया सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाजे यांनी दिली. कालचा Whats App स्टेट्स पाहून आम्हाला काळजी वाटली होती. मात्र, काल उशिरा रात्री अटक केल्याबाबत कुटुंबियांना कोणतीही माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली असल्याचे देखील सुधर्म वाझे यांनी सांगितले.

२५ फेब्रुवारीला प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरणी एनआयएने शनिवारी रात्री ११.५० वाजता सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे मुंबई पोलिस दलात खळबळ उडाली असून आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. स्कॉर्पिओ ठेवून दुसऱ्या इनोव्हातून आलेला चालक आणि अन्य एका व्यक्तीसह दुसऱ्या चालकाला अटक होण्याची शक्यता आहे. यासाठी एनआयएच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत. पोलीस अधिकारीही रडारवर असल्याने पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे.

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनसह स्कॉर्पिओच्या कटात थेट सचिन वाझेंचा सहभाग असल्याचा संशय आल्याने वाझेंना अटक करण्यात आली आहे. या कटात आणखी ५-७ जणांचा समावेश आहे. मुंबई पोलिस दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होऊ शकते. ठाणे येथून आणखी ३ जणांच्या अटकेची शक्यता असल्याचे एनआयएमधील सुत्रांनी सांगितले आहे.

You May Also Like

error: Content is protected !!