सचिन वाझे यांच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस आणखीनच आक्रमक, पुण्यातून केली नवी मागणी

पुणे, 14 मार्च : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर भाजप नेते (BJP) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधीमंडळात आक्रमक भूमिका घेत सरकारला कोंडीत पडकलं. त्यानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना नुकतीच NIA ने अटक केली. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.

‘हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. माझ्याकडे जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा असं वाटलं की पोलीसच असे वागत असतील तर काय?

सरकारने या प्रकरणात पाठीशी घातलं. मनसुख यांची हत्या ही गंभीर आहे. यात केवळ सचिन वाझे हे नाहीत. ही सुरुवात आहे. यात अजून कोण कोण आहे हे बाहेर आलं पाहिजे,’ अशी आक्रमक मागणी फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे:

– विरोधी पक्ष नेता म्हणून प्रकरण लावून धरणे हे माझं कामच आहे

– मुंबई पोलिसांवर अविश्वास, महाराष्ट्र द्रोह अशी टीका चुकीची आहे

– वाझे यांना इतकं महत्व का दिलं जातंय? हा मोठा प्लॉट आहे

– सचिन वाजे प्रकरण आल्या नंतर डेलकर प्रकरणी जाग आली का ?

– अँटिलिया बॉम्ब प्रकरणामुळे या सरकार समोर मोठं प्रश्न चिन्ह लागलं आहे

– सरकारने वाझे यांची वकिली केली आहे

– सचिन वाझे यांना हायकोर्टाने निलंबित केलं होतं

– त्यावेळी शिवसेनेनी त्यांना कामावर घेण्याची विनंती केली होती

– नंतर या सरकारने त्यांना कोरोनाच्या बहाण्याने कामावर घेतलं

– सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता, प्रवक्ता म्हणूनही काम पाहिलं

– मी गृहमंत्री असतांना वाझे यांना घ्या, असं त्यावेळेस शिवसेनेने सांगितलं होतं

– कोरोनात अधिकारी लागतील म्हणून कोरोनाच्या काळात त्यांना घेतलं

You May Also Like