साराकडून बेबोच्या ड्रेसची कॉपी; सोशलवर फोटो व्हायरल.

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने अल्प काळावधीतच मोठी फॅन फॉलोईग तयार केली आहे. सारा अली खान आणि तिची सावत्रआई करिना कपूर-खान यांच्यात खूप चांगले संबंध आहेत.

सारा बऱ्याच मुलाखतींमध्ये याबाबत उघडपणे बोलत असते. अलीकडेच सारा ही करिनाच्या ड्रेसिंग स्टाइलची कॉपी करताना दिसली आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओत सारा अली खान अतिशय स्टायलिश आणि ग्लॅमरस कपड्यांमध्ये दिसत आहे. गोल्डन आणि लाल रंगाचा हा थाई स्लीड ड्रेस सारावर खूपच चांगला दिसत आहे.

शिवाय साराचे सॅंडलदेखील तिच्या या लुकमध्ये भर घालत होते. साराचा हा ड्रेस हुबेहूब करिना कपूरच्या ड्रेससारखाच आहे. करिनाने आपल्या ‘कम्बख्त इश्‍क’ या चित्रपटातील एका गाण्यात असाच ड्रेस परिधान केला होता.

दरम्यान, सारा अली खान अलीकडेच करिना कपूरच्या ‘वॉट वुमन वॉन्ट’ या शोमध्ये आली होती. या कार्यक्रमात सारा अली खान आणि करिना कपूर यांनी दिलखुलास गप्पा मारल्या होत्या.

You May Also Like