सुविधांअभावी सिटी शहर नाक्यावर तपासणी रखडली

औरंगाबाद – केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या सूचनेनुसार शहरात येणाºया प्रत्येक नागरिकांची सिटी एंट्री पॉइंटवर शनिवारपासून तपासणी करण्याची घोषणा महापालिकेने केली. मात्र प्रत्यक्षात तपासणी पथकासाठी कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध न केल्यामुळे तपासणीला सुरूवातच झाली नाही. आता सोमवारचा मुहूर्त शोधण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या पथकाने केलेल्या सूचनेनुसार शहराच्या एंट्री पॉइंटवर कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. नगरनाका, नक्षत्रवाडी, दौलताबाद टी पॉइंट, चिकलठाणा, केंब्रिज शाळा चौक, हर्सूल, सावंगी नाका, झाल्टा फाटा या सहा ठिकाणी चाचण्या सुरू करण्याचे घोषित केले.

त्यानुसार आरोग्य विभागाची यंत्रणादेखील लावली होती. परंतु चाचणी पथकातील कर्मचाºयांसाठी शेड, लाईट, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे नगरनाका, झाल्टा फाटा येथील चाचणी केंद्र सुरू होऊ शकले नाहीत, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पट्टेकर यांनी दिली.

You May Also Like