हरयाणा : मुली शाळेच्या बॅगेत भलत्याच वस्तू घेऊन जात होत्या; सत्य समोर येताच शिक्षकही गोंधळात पडले!

हरयाणातील शहाबादमधील सरकारी शाळेतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुली पुस्तकं न आणता बॅगेतून मोबाईल, जीन्स, दोन टी-शर्ट शाळेत घेऊन येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापक आणि दोन महिला शिक्षकांकडून मुलींची बॅगेची तापसणी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

सदर प्रकाराची मुख्यधापकांनी चौकशी केली असता, मुली शाळेच्या मधल्या सुट्टीत कपडे बदलून शाळेतून पळून जात आणि सर्ववेळ बाहेर फिरत असल्याचे सांगितले. हा 7 विद्यार्थ्यांचा ग्रुप होता जो शाळेतून पळून जावून बाहेर इतरत्र फिरत असायचा. याबाबात स्वत: मुलींनी माहिती दिल्यानंतर शिक्षकही गोंधळात पडले.

You May Also Like

error: Content is protected !!