होय, ती इनोव्हा गाडी मीच चालवत होतो, Sachin Vaze यांनी दिली NIA ला कबुली

मुंबई, 17 मार्च : मुंबईतल्या दक्षिण मुंबई येथील मायकल रोडवर  स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी सापडलेल्या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहे. एनआयएच्या  टीमने एक इनोव्हा गाडी सुद्धा जप्त केली आहे. ती इनोव्हा कार आपणच चालवत होतो, अशी कबुली सचिन वाझे  यांनी दिली आहे.

25 फेब्रुवारी रोजी कार मायकल रोडवर जिलेटीन स्फोटकांनी कार सापडली होती. त्यानंतर घटनास्थळावर आणखी एक इनोव्हा कार आढळून आली होती. ही पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी सचिन वाझेच चालवत होते, अशी माहिती NIA च्या सूत्रांनी दिली. तसंच, हिरवी स्कॉर्पिओ आणि पांढरी गाडी चालवणारे दुसरे तिसरे कोणी नसून CIU चे पोलीस होते. अखेर या प्रकरणी एनआयएच्या टीमने चौकशी केली असता सचिन वाझे यांनी आपणच ती गाडी चालवत होतो अशी कबुली दिली आहे.

स्कॉर्पिओ गाडी उभी करून पांढऱ्या गाडीतून सचिन वाझे आणि आणखी दोन CIU चे अधिकारी बसून मुलूंड टोल नाक्यावरुन ठाण्याला गेले होते हिरवी आणि पांढऱ्या रंगाची इनोव्हा आणि स्कॉर्पिओ गाडी ठाणे येथेच पार्क केली होती, अशीही माहिती समोर आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तलयाजवळ सापडली कार

कार मायकल रोडवर जिलेटिन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली होती. त्याच वेळी या गाडीतील चालकाला काही वेळाने एका पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून नेण्यात आले होते. सचिन वाझे यांना अटक करण्यात आले असे ते कारण म्हणजे पांढऱ्या रंगाची हीच ती इनोव्हा गाडी. ही गाडी मुंबई पोलिसांची असल्याची माहिती समोर आली होती.

NIA ने ताब्यात घेतलेली पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार ही मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या  जवळून ताब्यात घेतली होती, ही कार गेल्या अनेक दिवसांपासून याच परिसरातच उभी होती. या कारच्या मागे मुंबई पोलीस असं लिहिलं आहे. कित्येक दिवस ही कार पोलीस आयुक्तालयातच उभी होती.

मर्सिडीज कारसोबत भाजप नेत्याचा फोटो

दरम्यान, एनआयएच्या टीमला सचिन वाझे वापरत असलेली एक मर्सिडिज कार सापडली आहे. या कारमध्ये पाच लाखांची रोकड आणि पैसे मोजणारी मशीन सापडली आहे. पण, आता या कारमुळे राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करून या गाडीसोबत भाजप पदाधिकाऱ्याचा संबंध असल्याचा दावा केला आहे.

You May Also Like