होळीला 499 वर्षांनंतर दुर्मिळ योग, जाणून घ्या काय आहे खास.

मुंबई : होळीचा सण हा फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पोर्णिमेच्या रात्री होलिका दहन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असतं. यावर्षी 28 मार्चला होलिका दहन केलं जाईल तर 29 मार्चला सकाळी धुलिवंदन असेल. पण, होळीचा सण यावर्षी आणखी एका कारणामुळे खास ठरणार आहे

ज्योतिषशास्त्र जाणकारांच्या मते, यावेळी होळीवर 499 वर्षांनंतर ग्रहांचा दुर्मिळ योग येतो आहे. चला जाणून घेऊ या खास योगाबाबत –

यंदाच्या होळीला तब्बल 499 वर्षानंतर दुर्मिळ योग

यावेळची होळी खूप खास असणार आहे. तब्बल 499 वर्षांनंतर होळीच्या निमित्ताने अत्यंत दुर्मिळ योग तयार होणार आहे. 29 मार्चच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कन्या राशीत विराजमान होईल, तर शनि ग्रह स्वतःच्या राशीमध्ये राहील. असा ग्रह योगायोग 3 मार्च 1521 रोजी झाला होता. त्यामुळे होळीला 499 वर्षानंतर दुर्मिळ महायोग तयार होतो आहे. त्याशिवाय, यावेळी सर्वार्थसिद्धि योगात होळी साजरी करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे अमृतासिद्धी योगही या दिवशी येणार आहे .

You May Also Like