कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1 लाख 1 कोटींची कर्ज हमी योजना: निर्मला सीतारामण

नवी दिल्ली : करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं नव्यानं काही योजना जाहीर केल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी यासंबंधीची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य, पर्यटन, शेती अशा वेगवेगळ्या घटकांसाठी आर्थिक तरतूदीची घोषणा केली.

कोव्हिडग्रस्त भागांसाठी 1 लाख 1 कोटींच्या क्रेडिट गॅरंटी योजनेची (कर्ज हमी) घोषणा करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी 50 हजार कोटींची घोषणा करण्यात आली आहे. या निधीचा वापर आरोग्यविषयक सुविधांच्या उभारणीसाठी होणार आहे.

आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ववत झाल्यानंतर भारतात येणार्‍या पहिल्या 5 लाख परदेशी व्यक्तींना व्हिसासाठीचं शुल्क द्यावं लागणार नाही. 31 मार्च 2022 पर्यंत ही योजना लागू असेल. एका परदेशी व्यक्तीला एकदाच या योजनेचा फायदा घेता येईल. देशातील सगळ्या ग्रामपंचायतींपर्यंत ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी पोहोचवण्यासाठी 19 हजार 41 कोटी रुपये अधिक देण्याची घोषणाही सीतारामण यांनी केली.

खतांसाठी जे 85 हजार 413 कोटी रुपयांचं अनुदान दिलं, त्यात 14 हजार 775 कोटी रुपयांचं अधिक अनुदान जाहीर करण्यात आलं आहे.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like