भारतात गेल्या २४ तासांत १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद

नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून  देशात पुन्हा एकदा करोनाचा तांडव सुरु झाला आहे. पुन्हा एकदा सर्वत्र  चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. भारतात गेल्या २४ तासात १ लाख ६१ हजार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या १ कोटी ३६ लाख ८९ हजार ४५३ वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

दरम्यान,देशात सध्याच्या घडीला १२ लाख ६४ हजार ६९८ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोमवारी देशात एकाच दिवसात १ लाख ६८ हजार ९१२ करोना रुग्ण आढळले असून आतापर्यंतचा हा उच्चांक मानला जात आहे. १८ ऑक्टोबरपासूनचा हा उच्चांकी आकडा आहे.

देशात आतापर्यंत १ कोटी २२ लाख ५३ हजार ६९७ करोना रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १ लाख ७१ हजार ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान देशात १० कोटी ८५ लाख ३३ हजार ८५ जणांचं लसीकरण झालं आहे.

 

You May Also Like

error: Content is protected !!