पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची तातडीची मदत जाहीर

मुंबई ।   कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लोकांची उभी पिकं नष्ट झाली, घरं कोसळली, संसार उघड्यावर आले.  मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील पूरग्रस्त भागाचा दौरा करत होते. यात नुकसानीचा आढावा घेऊन पूरग्रस्तांना मदत केली जाईल असं सांगितलं जात होतं. अखेर राज्य सरकारनं आजच्या मंत्रिमंडळात ही मदत जाहीर केली आहे.

 

 

अतिवृष्टीमुळे राज्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी तातडीची मदत तसेच दुरुस्ती व इतर दीर्घकालीन उपायांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपये खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मदत व पुनर्वसन विभागाने नुकसानी बाबत सादरीकरण केले. त्यानंतर मंत्रिमंडळात यास मान्यता देण्यात आली आहे.

You May Also Like