भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद जुंपल्याने यात गिरीश महाजन यांच्यासह भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. यात गिरीष महाजन यांच्यासह, पराग अळवणी, राम सातपुते, संजय कुटे, अशिष शेलार, अभिमन्यू पवार,अतुल भातखळकर शिरीष पिंपळे, जयकुमार रावल, योगेश सागर नारायण कुचे, किर्तिकुमार बागडिया यांचा समावेश आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारकडून एमपीरिकल डेटा मागवण्याबाबत ठराव मांडण्यात आला होता भाजपच्या या 12 आमदारांनी गोंधळ घातला यावेळी अध्यक्ष भास्कर जाधव यांनी आवाजी मतदानाने ठराव मंजूर केला. त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले गिरीश महाजन आणि संजय कुटे यांनी तर अध्यक्षांचा राजदंड पळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या वादामुळे या 12 आमदारांना एक वर्ष निलंबित करण्यात आले आहे.

You May Also Like

error: Content is protected !!