पोलिस-नक्षलींमध्ये झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झटापट झाली. यामध्ये पोलिसांना 13 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. आज (दि.21) पहाटेच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील पयडी-कोटमी परिसरातील जंगलात ही घटना घडलीय.

गडचिरोलीचे पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) संदीप पाटील यांच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र पोलिसांनी केलेली ही कारवाई यशस्वी झाली आहे. दरम्यान, चकमक अजूनही सुरू असून मृतदेह एकत्र करण्याचं काम सुरू आहे. एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत ही माहिती अभियान संपल्यावर सांगता येईल. या चकमकीत आणखी नक्षलवादी ठार झाले असण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितले.

तर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले की, सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबविण्यात आले. या कारवाई दरम्यान नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणार्‍या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. याची चाहूल लागताच नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार केला. या चकमकीत 13 नक्षली ठार झाले, अशी त्यांनी माहिती दिली.

You May Also Like