अबूधाबीत भारतीयाला २० कोटींची लॉटरी; मित्रांसोबत करणार शेअर

ओमानमध्ये राहणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला शुक्रवारी रात्री ड्रॉमध्ये तब्बल एक कोटी दीरहाम (अमिरात चलन) म्हणजेच जवळपास २० कोटींची लॉटरी लागलीय. या भारतीयाचं नाव रंजीत वेणुगोपालन उन्नीथन असे आहे. ४२ वर्षीय रंजीत मूळ केरळच्या कोल्लम जिल्ह्याचा रहिवासी आहे.
हा ड्रॉ जिंकल्यानंतर रंजीत यंदाच्या वर्षातील शेवटचा ‘बिग तिकीट अबूधाबी’ करोडपती बनलाय. दुसऱ्या प्रयत्नात तो यशस्वी ठरलाय. तिकीट क्रमांक ०५२७०६ वर त्याला हा जॅकपॉट लागला आहे.
मी गेल्या १२ वर्षांपासून ओमानमध्ये राहत आहे. मी पहिले बिग तिकीट दोन वर्षांपूर्वी खरेदी केले होते. मला तारीख लक्षात नाही. परंतु, ते तिकीट केवळ खाते उघडण्यासाठी मी खरेदी केले होते. मी आणि माझ्या काही मित्रांनी ते तिकीट खरेदी करण्यासाठी पैसे जमा केले हते. परंतु, आमच्या नशिबाने आमची साथ दिली नाही त्यामुळे ही यात सहभागी होणे बंद केले होते असा अनुभव रंजीतने मीडियाशी बोलताना शेअर केला.
यंदा मात्र रंजीतचे भाग्य उजळले. आपण जिंकलेली रक्कम आपल्या पाच मित्रांसोबत शेअर करणार असल्याचेही रंजीतने म्हटले आहे. तिकीट खरेदीसाठी याच मित्रांनी योगदान दिल्याची आठवण रंजीतला कायम आहे. रंजीत विवाहीत असून त्याला एक पाच वर्षांची मुलगी आहे.
उल्लेखनीय म्हणजे यंदाच्या ‘बिग तिकीट अबूधाबी’मध्ये अनेक भारतीयांचे नशीब उजळले आहे. याअगोदर ऑक्टोबर महिन्यात ‘बिग तिकीट अबूधाबी’ सीरिजच्या २३२ व्या ड्रॉमध्ये भारतीय नागरिक नहील निजामुद्दीन याने एक कोटी दीरहाम म्हणजेच २० कोटी रुपयांहूनही अधिक रक्कम जिंकली होती. दुसरा ड्रॉ सौदी अरबमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीय अँजेलो फर्नांडिस यांनी जिंकला होता. २५ सप्टेंबर रोजी खरेदी केलेल्या तिकीटावर त्यांनीही भरघोस रक्कम जिंकली होती.

You May Also Like