बारावीसाठी 20:40:40 फॉर्म्युला, 3 वर्षांच्या गुणांवर मिळणार निकाल

मुंबई : 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता गुण देण्याचे सूत्र शिक्षण विभागाने निश्चित केले असुन 10 वी, 11 वी आणि 12 वीच्या अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकलच्या आधारे हे गुण दिले जाणार आहेत. त्यासाठी 20: 40: 40 असा फॉर्म्युला निश्चित केल्याची माहिती सुत्रांकडुन मिळतेयं.

दरम्याण, राज्याच्या शिक्षण विभागाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना गुण देण्याबाबतचे सूत्र निश्चित करण्याच्या अनुंषगांने अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यावर तज्ज्ञांच्या अनेक बैठका होऊन फॉर्म्युला निश्चित झाल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले. यात इयत्ता 10 वीचे 20 टक्के गुण, इयत्ता 12 वीचे 40 टक्के गुण आणि इयत्ता 12 मधील अंतर्गत परीक्षा व प्रॅक्टिकल असे 40 टक्के गुण विचार घेतले जाणार आहेत.

या सूत्रानुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ निकाल जाहीर करेल. यासंदर्भातली शिक्षण विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दोन दिवसांत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड अंतिम निर्णय जाहीर करतील, अशी सूत्रांची माहिती आहे. इयत्ता 10 वी परीक्षा यंदा झालेली नाही. मात्र 11 वी प्रवेशासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतली जाणार आहे. त्याची माहिती आठवड्यात जाहीर केली जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आलीयं.

 

 

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या  फेसबुक पेजला  आणि  टि्वटरवर  आम्हाला फॉलो करा…

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like

error: Content is protected !!