देशात 24 तासांत 217353 नवे रुग्ण

नवी दिल्ली : देशातील करोना स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. काही महिन्यापासून प्रभाव कमी झालेल्या करोनाने पुन्हा आपले डोके वर काढले आहे. दिवसेंदिवस  चिंता वाढवणारी करोना रुग्णांची संख्या समोर येत आहे. दरम्यान आज देशात पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोनारुग्ण समोर आले.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 2,17,353 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर 1185 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक गोष्ट म्हणजे, 1,18,302 जण करोनावर मात करून ठणठणीत बरेही झाले आहेत. यापूर्वी बुधवारी देशात 2,00,739 नवे कोरोना रुग्ण समोर आले होते. तर गेल्या 30 सप्टेंबरला देशात अकराशे हून अधिक कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता.

आजची करोना स्थिती 

  • एकूण करोनाबाधित – एक कोटी 42 लाख 91 हजार 917
  • एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 15 लाख 69 हजार 743
  • एकूण बरे झालेले रुग्ण- एक कोटी 25 लाख 47 हजार 866
  • एकूण मृत्यू – 1 लाख 74 हजार 308
  • एकूण लसीकरण – 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 डोस देण्यात आले आहेत.

 

 

You May Also Like

error: Content is protected !!