देशात २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नवे बाधिततर २७६७ मृत्यू,!

नवी दिल्ली :   देशात करोना दिवसेंदिवस अधिकाधिक  गंभीर होत आहे. करोनाने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत आहे. दरम्यान,केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशभरात २४ तासांत तब्बल २७६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनामुळे आत्तापर्यंत भारतात झालेल्या मृतांची संख्या १ लाख ९२ हजार ३११ इतकी झाली आहे. त्यासोबतच २४ तासांमध्ये सलग चौथ्या दिवशी भारतात ३ लाखांहून जास्त करोनाबाधित सापडले आहेत. रविवारच्या आकडेवारीनुसार २४ तासांत ३ लाख ४९ हजार ६९१ नव्या करोनाबाधितांची भर पडली आहे. त्याचवेळी देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या देखील वाढली असून आजघडीला देशात करोनाचे एकूण २६ लाख ८१ हजार ७५१ अॅक्टिव रुग्ण आहेत.

देशात आजपर्यंत एकूण १ कोटी ६९ लाख ६० हजार १७२ करोनाबाधित सापडले आहेत. तर त्यापैकी १ कोटी ४० लाख ८५ हजार ११० रुग्ण हे बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रिकव्हरी रेटच्या बाबतीत काहीसा दिलासा असला, तरी गेल्या दोन महिन्यांमध्ये देशातील करोनाची रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी संचारबंदी, जमावबंदी, करोना निर्बंध किंवा लॉकडाऊन असे पर्याय स्वीकारून करोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

 

You May Also Like