३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात कर्जाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव : येथील ३० वर्षीय तरुणाने राहत्या घरात कर्जाला कंटाळून
गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जळगावातील समतानगर येथे घडली. राजू पन्नालाल यादव असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती शी की, जळगाव शरातील समतानगर परिसरातील राजु पन्नालाल यादव वय 30 याने एका व्यक्ती जवळून एक ते दीड वर्षापूर्वी रेतीचे डंपर विकत घेतले होते. सदर या डंपरला दुरुस्तीसाठी राजुने अडीच ते तीन लाखरुपये खर्च लावले होते. सदर डंपर देणा-या व्यक्तीचे 50 हजार रुपये राजू यादव याच्याकडे बाकी होते. समोरील व्यक्ती त्याला पैसेची सतत मागणी व धमक्या देत होता. राजू जवळ असलेले रेतीचे डंपर समोरील व्यक्ती बळजबरीने हिसकावून घेऊन गेल्यामुळे राजु यादव हा काही दिवसापासून तनावा मध्ये होता. असे राजु यादव यांच्या नातेवाईकांनी सांगितले . काल रात्री 11 वाजता जळगाव शहरातील समतानगर येथे राहात्या घरात कडीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. राजु यादव यांचे जळगाव शहरातील आटोनगर मध्ये डंपर बॉडी चेसेस रिपेरिंगचे गॅरेज आहे. त्याच्या पश्चात 2 मुली, पत्नी, आई , 3 बहिणी ,1 मोठा भाऊ असा परिवार आहे.याबाबत रामानंदनगर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

You May Also Like