भायखळा जेलमध्ये इंद्राणी मुखर्जीसह 38 महिला कैदी करोना बाधित

मुंबई : राज्यात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये सोबतच मृतांच्या संख्येतही वाढ होत असल्याचं चित्र आहे. दरम्यान आता भायखळा तुरुंगातही  कोरोनाचा विस्फोट झाल्याचं समोर आलं आहे. या तुरुंगात एकाच दिवसात 38 महिला कैदी कोरोनाबाधित  झाल्याचं आढळून आलं आहे.एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणावर तुरुंगातील कैदी बाधित होण्याची ही पहिलीच वेळ आहे यात शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीलाही करोनाची लागण झाली आहे.

तसेच, राज्यातील अनेक कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. यामुळे सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचंही पालन होताना दिसत नाही. त्यामुळे, तुरुंगातील कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. याआधीही कोल्हापूर कारागृहात 10 दिवसांपूर्वी एकाच वेळी 28 कोरोना रुग्ण आढळले होते.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

You May Also Like