CoronaVirus : इगतपुरीत उद्यापासून ५ दिवस जनता कर्फ्यु

नाशिक: राज्यासह नाशिक जिल्ह्यातही करोनाचा पार्धुर्भाव हा अतिशय चिंतादायक आहे. करोना संख्येला आवर घालता यावा म्हणून राज्य सरकारने संपूर्ण राज्यात कडक निर्बंध लागू केले. परंतु तरीही नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती हि कंट्रोल मध्ये नाही. नाशिक शहरासह नाशिक मधील अनेक तालुक्यांमध्ये करोना स्थिती चिंतादायी आहे.

दरम्यान नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि परिस्थिती हाताबाहेर जात असून तालुक्यातील करोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या तीनशेच्या वर गेली आहे. याच अनुषंगाने इगतपुरी नगरपरिषद येथे मुख्याधिकारी निर्मला गायकवाड/पेखळे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक झाली.

दरम्यान, या बैठकीत तहसीलदार परमेश्वर कासुळे, इगतपुरी पोलीस ठाणेचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांचा उपस्थितीत व्यापारी बांधवांनी सहभाग नोंदवून पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनानंतर ५ दिवसीय जनता कर्फ्यु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत हॉस्पिटल व मेडिकल सुविधा व्यतिरिक्त संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

ठाणे आणि नगर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याकारणाने शहरातील गर्दी कमी होत असतांना दिसत नसल्याने तातडीने बैठक आयोजित केली होती. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नगरपरिषद हद्दीतील सर्व अत्यावश्यक सेवेची दुकाने ( मेडीकल व दवाखाने वगळुन), व्यापारी आस्थापना ह्या दि. २० एप्रिल पासुन ते २५ एप्रिल पर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, फक्त दुध विक्रत्यांना दुध विक्रीसाठी सकाळी ६ ते ८ व सध्यांकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा असणार आहे. बंद काळात सुचनांचे पालन न केल्यास इगतपुरी नगरपरिषद व पोलीस प्रशासनामार्फत कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती मुख्याधिकारी निर्मला गायकवाड व प्रभारी पोलीस निरीक्षक दिपक पाटील यांनी दिली.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeE

 

You May Also Like