सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफ कोरोनाबाधित

नवी दिल्ली: पुन्हा एकदा देशात करोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्के स्टाफला करोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता इथून पुढच्या सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंच्या माध्यमातून घरुनच केली जाणार आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.

तसेच, याच पार्श्वभूमीवर सर्व ठरलेल्या प्रकरणांवरील सुनावणी एक तास उशिरानं होणार आहे. एका न्यायाधीशांनी एनडीटीव्हीसोबत बोलताना सांगितलं की, “माझ्या बर्‍याच कर्मचार्‍यांना आणि लिपिकांनी कोरोनाची लागण झाली आहे.” काही न्यायाधीशांना यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, मात्र आता ते बरे झाले आहेत.

दरम्यान, करोनाचा प्रसार मागच्या आठवड्यात प्रचंड वेगानं झाला आहे. तर, रविवारी नोंद झालेल्या नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येनं  आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी एका दिवसात 1,69,899 नवीन कोरोना रुग्णांची नोंद  झाली आहे. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळून आलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर, देशात रविवारी 904 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

You May Also Like