धक्कादायक ! सरकारी रुग्णालयातून रेमेडीसीवीर इंजेक्शनचे 850 डोस चोरीला

भोपाल : करोना रुग्णांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत बेड, ऑक्सिजन, आणि रेमेडिसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. याच दरम्यान. रेमेडिसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असताना आता या इंजेक्शनची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भोपाळमधील एका सरकारी रुग्णालयातून रेमेडिसीवीर इंजेक्शनचे तब्बल 850 डोस चोरी गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हमीदीया रुग्णालयात मुबलक असलेल्या रेमडिसीव्हीर इंजेक्शनचा काही दिवसांपूर्वीच आला होता. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने रेमडिसीव्हीर इंजेक्शनची मागणी वाढली असून मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळेच, चोरट्यांनी रुग्णालयातील रेमेडिसीवीर इंजेक्शनच्या बॉक्सवरच डल्ला मारला आहे. औषध असलेल्या खोलीची खिडकी तोडून हे इंजेक्शन लंपास करण्यात आले आहेत. या चोरट्यांना रुग्णालयातील स्टाफनेच मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, याप्रकरणी, कोहेफिजा पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. राज्यात आत्तापर्यत 42 हजार इंजेक्शनचा पूर्तता झाल्याचं मध्य प्रदेश सरकारने म्हटले आहे. सरकारने 50 इंजेक्शनची ऑर्डर दिली असून 9,788 इंजेक्शनचा पुरवठा आजच करण्यात येणार आहे. उर्वरीत इंजेक्शन पुढील 3 दिवसांत येतील, असेही सांगण्यात आले. दरम्यान, रेमडेसीवीर इंजेक्शनची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

ताज्य बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या फेसबुक पेज  आणि टि्वटरवर आम्हाला फॉलो करा… 

आमच्या व्हॉटस्अ‍ॅप गृपला जॉईन होण्यासाठी ब्लू लाईनला टच करा

https://chat.whatsapp.com/C2lBmNXGceHGLS7IeElqI6

 

You May Also Like