शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकारकडून ९.७५ कोटी जमा

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी सरकारच्या पीएम-किसान योजनेअंतर्गत ९.७५  कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना सुमारे १९,५०० कोटी रुपये हस्तांतरित केले. सरकारने आतापर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना सुमारे १.५७ लाख कोटी रुपयांचे नऊ हप्ते दिले आहेत. रक्कमेचे वाटप केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशभरातील या योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी तेलांचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी एका योजनेची घोषणा केली.

 

 

 

पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वर्षाला ६ हजार रुपये दिले जातात. या योजनेची घोषणा २०१९च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेंतर्गत मदतनिधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो.

You May Also Like