बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या १२ पैकी ९ आरोपींना न्यायालयात हजर

जळगाव : बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या १२ पैकी ९ आरोपींना न्यायालयात हजर केले होते. यावेळी संशयितांची १० दिवस पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी काही महत्वपूर्ण कारणे न्यायालयाला सांगितली. त्यात आर्थिक अपहार व गैरव्यवहार संगनमताने व पूर्व नियोजित कटाने झाला आहे. अटक आरोपींचा गुन्हयातील यापुर्वी अटक आरोपी व पाहिजे असलेल्या आरोपींसोबत काय संबंध आहे?, अटक आरोपींनी स्वत:च्या बँक खात्यातुन ठेवीदारांव्यतिरिक्त इतर कोणास आरटीजीएस, एनईएफटी किंवा चेकव्दारे पैसे दिले आहेत काय? यासह पुरावे गोळा करण्यासाठी विविध जिल्हयात तपासकामी आरोपीसह जावून तपास करणे आवश्यक असण्यासह तब्बल १७ गंभीर कारणांचा समावेश आहे.

अटक आरोपीची पोलीस कोठडी मिळण्याची कारणे

१) आरोपींनी बीएचआर पतसंस्थेतून कर्जाच्या नावाखाली घेतलेली रक्कम परतफेड न करता वेगवेगळया ठेवीदारांच्या ठेवी कमी किमतीत घेवून स्वत:चे पुर्ण पैसे परतफेड करण्यासाठी वापर केला आहे. सदर कटामध्ये आरोपी सोबत कोणकोण सामील आहे याचा तपास करणे आहे.

२) अटक आरोपी यांनी ठेवीदारांच्या ठेवपावत्या गोळा करण्यासाठी नेमलेले एजंट नामे अनिल पगारीया, संतोष बाफना, अशोक रूणवाल, शिरीष कुवाड, अतुल गांधी व चव्हाण यांचे व्यतिरिक्त अजून कोण होते व त्यांचा नमूद गुन्हयात सहभाग काय आहे याबाबत तपास करणे आहे. तसेच वरील एजंट यांचेकडे देखील आरोपी समक्ष चौकशी करणे आवश्यक आहे.

३) अटक आरोपींनी या गुन्हयातील इतर आरोपी नामे सुनिल देवकीनंदन झंवर, सुरज सुनिल झंवर, महावीर जैन, जितेंद्र कंडारे, सुजित वाणी, विवेक ठाकरे इ. यांचेशी संगनमत करून गुन्हा केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक आरोपीची भुमिका कशी होती याबाबत तपास करणे आहे. तसेच नमूद आरोपी यांची कर्जखाती निरंक करण्यामागे संबंधितांचा काय सहभाग आहे याचा सखोल तपास करणे आहे.

४) नमूद गुन्हयातील आरोपी नामे सुनिल झंवर व सुरज झंवर यांचे कार्यालयात मिळालेल्या संगणकावरील डाटामध्ये ठेवीदार व कर्जदार यांच्या याद्या मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे त्याचेशी नमूद अटक आरोपींचा काय संबंध आहे हे तपासात निष्पन्न करणे आहे.

५) नमूद गुन्हयातील यापूर्वी अटक केलेले व पाहिजे आरोपीचे ऑफीसमधून मोठया प्रमाणावर दस्तऐवज जप्त करण्यात आलेले असून त्यामध्ये काही दस्तऐवज वरील अटक आरोपी याचेशी संबंधित आहे. नमूद दस्तऐवजा बाबत आरोपीकडे तपास करणे आहे.

You May Also Like