उमेदवारांचे गुन्हेगारी रेकॉर्ड जाहीर न केल्याने ‘या’ राजकीय पक्षांना दंड

नवी दिल्ली । राजकीय  पक्षाच्या उमेदवारांवरील गुन्ह्यांची माहिती सार्वजनिक करा असा आदेश देऊनही त्याचे पालन बिहारच्या निवडणुकीच्या वेळी न केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने नऊ राजकीय पक्षांना आर्थिक दंड त्याबद्दल सुनावला आहे. यात भाजप, कॉंग्रेस यांच्या सह अन्य पाच पक्षांना प्रत्येकी एक लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला प्रत्येकी पाच लाख रूपयांचा दंड या प्रकरणात ठोठावण्यात आला आहे.

 

 

राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कोर्टाच्या पुढाकाराने उपाययोजना करण्यात आली होती. कोर्टाने प्रत्येक राजकीय पक्षाला त्यांच्या उमेदवारांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहितीे निवेदन किंवा जाहीरात देऊन प्रकाशित करावी अशी सुचना त्यांना करण्यात आली होती.

You May Also Like

error: Content is protected !!