SSC परीक्षेत बॉईज टाऊन पब्लिक स्कूलचा 99.40% निकाल

नाशिक : 2021-2022 SSC च्या परीक्षेत बॉईज टाऊन पब्लिक स्कूलच्या 10 वी च्या विद्यार्थ्यांचे  घवघवीत यश. शाळेचा एकूण 99.40%निकाल लागला आहे. 92.60% गुण मिळवून प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली आहे कु. भारती भोंग, दुसरा क्रमांक  92.20 % गुण मिळवून कु. परमी गोहिल हिने पटकावला तर तिसऱ्या क्रमांकावर 92% गुण मिळवणारी कु. प्रांजली तागड ही आहे .

एकूण 13 विद्यार्थ्यांनी 90 % पेक्षा जास्त गुण मिळविले. विद्यार्थ्यांना त्यांच्या या यशासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. स्वामिनी वाघ व शाळेचे शिक्षकवृंद यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले.

शाळेचे विश्वस्त श्रीमान नेवील सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

ताज्या बातम्यांच्या अपडेट्साठी आमच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपला जॉईन व्हा…

https://chat.whatsapp.com/GdbPgC62cnKHS4YUh0x6LE

You May Also Like